श्रीहरिकोटा, चेन्नई : जीसॅट-9 या दक्षिण आशिया दूरसंचार उपग्रहाचं यशस्वी प्रक्षेपण करण्यात आले. ही एक ऐतिहासिक मोहीम असून प्रतिबद्धतेचे नवीन क्षितीज खुले झालेय, असे म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शास्त्रज्ञांचे कौतुक केलेय.
'दक्षिण आशियाई उपग्रह' अर्थात GSAT - 9 उपग्रहाचं यशस्वी प्रक्षेपण झालंय. तामिळनाडूतल्या इस्रोच्या श्रीहरीकोटामधल्या सतीश धवन स्पेस सेंटरमधून ४ वाजून ५७ मिनिटांनी जी-सॅट-९ आकाशात झेपावला.
ही मोहीम य़शस्वी झाल्यानं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी इस्त्रोच्या शास्त्रज्ञांचं अभिनंदन केलंय. सार्क समुहातील भारताबरोबर इतर सात देशांसाठी ' सार्क ' उपग्रहाची संकल्पना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०१४ मध्ये नेपाळमधल्या १८ व्या सार्क परिषदमध्ये मांडली होती. मात्र पाकिस्ताननं या उपग्रहाचा वापर करण्यास नकार दिला. त्यामुळे सार्क ऐवजी दक्षिण आशियाई उपग्रह असं याचं नामकरण करण्यात आलं.
#WATCH: ISRO launches South Asia Satellite GSAT-9 from Andhra Pradesh's Sriharikota. pic.twitter.com/wbANKY4yq2
— ANI (@ANI_news) May 5, 2017
आपातकालीन परिस्थितीमध्ये संपर्कासाठी, संदेशवहनासाठी या उपग्रहाचा प्रामुख्यानं वापर केला जाणाराय. तसंच डीटीएच सेवेसाठीही या उपग्रहाचा उपयोग होणाराय.