तुमच्या मोबाईलमध्ये येणार 'पॅनिक बटन'...

महिला सुरक्षेसाठी केंद्र सरकारनं सगळ्याच मोबाईल फोन बनवणाऱ्या कंपन्यांना आपल्या सेलफोनमध्ये पॅनिक बटन लावण्याचे आदेश दिलेत, असं महिला तसंच बालविकास मंत्री मनेका गांधी यांनी शुक्रवारी माहिती दिलीय. 

Updated: Oct 3, 2015, 02:52 PM IST
तुमच्या मोबाईलमध्ये येणार 'पॅनिक बटन'... title=

नवी दिल्ली : महिला सुरक्षेसाठी केंद्र सरकारनं सगळ्याच मोबाईल फोन बनवणाऱ्या कंपन्यांना आपल्या सेलफोनमध्ये पॅनिक बटन लावण्याचे आदेश दिलेत, असं महिला तसंच बालविकास मंत्री मनेका गांधी यांनी शुक्रवारी माहिती दिलीय. 

विद्यार्थ्यांच्या समस्यांशी निगडीत मुद्यावर बोलताना मेनका गांधी यांनी आता सगळ्याच फोन्समध्ये एक पॅनिक बटण असेल, असं म्हटलंय. हे बटन जीपीएसशी जोडलेलं असेल. आम्ही फोन निर्मात्यांशी बोलत आहोत. हा प्रस्तावाची येत्या काही महिन्यांमध्ये अंमलबजावणी होण्याची शक्यता आहे. 

अडचणीच्यावेळी उपयोगात येणाऱ्या अॅप वापरण्यासाठी जास्त वेळ लागतो. फोनमध्ये एकच बटन असेल तर अडीअडचणीच्या वेळी खूप सोईस्कर ठरू शकतं, असं प्रशासनाला वाटतंय. यावर लावण्यात आलेलं पॅनिक बटन काही नंबर्सवर एक एसएमएस पाठवेल. यामध्ये बटन दाबणाऱ्या व्यक्तीची स्थिती दाखवणारी माहिती पाठवली जाईल, अशी माहितीही त्यांनी यावेळी दिलीय. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.