आता भारत सरकारही सुरू करणार `सत्यमेव जयते`!

एकीकडे अभिनेता आमिर खानचा शो `सत्यमेव जयते` प्रसिद्ध होत असतांना दुसरीकडे केंद्र सरकार आपल्या संदेशाचा सन्मान होण्यासाठी प्रयत्न करतोय.

Aparna Deshpande Aparna Deshpande | Updated: Apr 6, 2014, 07:48 PM IST

www.24taas.com, वृत्तसंस्था, नवी दिल्ली
एकीकडे अभिनेता आमिर खानचा शो `सत्यमेव जयते` प्रसिद्ध होत असतांना दुसरीकडे केंद्र सरकार आपल्या संदेशाचा सन्मान होण्यासाठी प्रयत्न करतोय.
`सत्यमेव जयते` हा केवळ शो नाही तर आपल्या भारतीय मुद्रेखाली लिहिलेला संदेश आहे. मात्र हा संदेश योग्यपणे मांडला जात नसल्यानं गृहमंत्रालय चिंतीत आहे. नुकतंच याबाबत गृहमंत्रालयानं सर्व राज्य आणि केंद्रीय सरकारी संस्थांना तपशीलवार सूचना पाठवलीय. यात भारताचं राष्ट्रीय प्रतिक असलेल्या या चिन्हाचा योग्य पद्धतीनं वापर करण्याच्या सूचना केल्या आहेत. यासाठी जाहिरातींचा वापर करण्यासही सांगितलंय.
काही काळापासून हे लक्षात आलंय की, इमारती, गाड्या, वेबसाईट, प्रकाशनाचा वापर करणाऱ्या विविध सरकारी संस्थामध्ये नेहमी सत्यमेव जयतेचा वापर करत नाही. केवळ सिंहाचं चिन्हच हे लोक वापरतात. मात्र त्याखाली असलेला `सत्यमेव जयते` हा संदेश वापरत नाहीत. त्यामुळंच आता केंद्र सरकारनं हे पाऊल उचललंय.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.