आंबेडकर झाले हक्काच्या घराला पारखे!

इंदू मिलची जमीन डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकासाठी देण्याची घोषणा संसदेत झाली असली तरी बाबासाहेबांच्या मालकीची जमीन मात्र अजुनही केंद्र सरकाच्याच ताब्यात आहे.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Dec 6, 2012, 08:35 AM IST

www.24taas.com, नवी दिल्ली
इंदू मिलची जमीन डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकासाठी देण्याची घोषणा संसदेत झाली असली तरी बाबासाहेबांच्या मालकीची जमीन मात्र अजुनही केंद्र सरकाच्याच ताब्यात आहे.
घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावे दिल्लीमध्ये जवळजवळ २४ एकर जमीन आहे. देशाचे पहिले कायदेमंत्री असताना १९५१ मध्ये डॉ. आंबेडकरांनी ही जमीन खरेदी केली होती. दिल्ली शहरातील मुनिरका परिसरातील मोहम्मदपूर या खेड्यातील एका शेतकऱ्याकडून त्या काळी सहा रुपयांच्या मोबदल्यात डॉ. आंबेडकरांनी ही जमीन विकत घेतली होती. सातबाराच्या उताऱ्यानुसार आंबेडकरांनी बारा एकर जमीन स्वत:च्या आणि बारा एकर सविता आंबेडकर यांच्या नावे खरेदी केली होती. पण या जमिनीवर सध्या दिल्ली सरकारनंच अतिक्रमण केल्याचं चित्र दिसतंय. दिल्लीतल्या एका मंत्र्यांच्या वरदहस्ताच्या साहाय्यानं स्थानिक जमीन माफियांनी या जमिनीवर ताबा मिळवून तिथं झोपडपट्टी उभारलीय. या मंत्र्याच्या मतदारसंघाच्या परिसरातच ही जमीन आहे.
दिल्लीतल्या मोक्याच्या ठिकाणी असलेली ही जमीन परत मिळवण्यासाठी बाबासाहेब आंबेडकरांच्या वारसांनी अनेक प्रयत्न केले पण ते निष्फळ ठरले. बाबासाहेबांचे नातू प्रकाश आंबेडकर नायब राज्यपाल कार्यालय तसंच दिल्ली सरकारकडे सातत्याने पाठपुरावा केला. पण हाती काहीच लागलं नाही तेव्हा प्रकाश आंबेडकर यांनी पंतप्रधानांकडे दाद मागण्याची तयारी सुरू केलीय.