धर्माच्या आधारावर भेदभाव केला जाणार नाही - योगी आदित्यनाथ

उत्तरप्रदेशच्या मुख्यमंत्रीपदाची सुत्रे हाती घेतल्यानंतर योगी आदित्यनाथ यांनी पहिल्यांदाच गोरखपूरला भेट दिली. 

Updated: Mar 25, 2017, 09:44 PM IST
धर्माच्या आधारावर भेदभाव केला जाणार नाही - योगी आदित्यनाथ title=

गोरखपूर : उत्तरप्रदेशच्या मुख्यमंत्रीपदाची सुत्रे हाती घेतल्यानंतर योगी आदित्यनाथ यांनी पहिल्यांदाच गोरखपूरला भेट दिली. 

उत्तरप्रदेशातील सरकार केंद्रातील मोदी सरकारप्रमाणेच सबका साथ सबका विकासच्या मार्गावर चालणार असं त्यांनी सांगितलं. तर धर्माच्या आधारावर भेदभाव केला जाणार नाही असा मोठा संदेशही त्यांनी यावेळी दिला. 

तर कैलास मानसरोवर यात्रेसाठी 1 लाखांचं अनुदान दिलं जाईल अशी घोषणाही त्यांनी केली. सभेनंतर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ गोरखनाथ मंदिरात गेले. तिथे त्यांनी विशेष पूजा केली.