मुंडे यांचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने नाही - रिपोर्ट

केंद्रीय ग्रामीणविकास मंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंडे यांचे हृदय बंद पडल्याने मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यांना हार्ट अॅटॅक आलेला नाही तर त्यांना अंतर्गत झालेल्या जखमेमुळे त्यांना मृत्यू झाल्याचे पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये स्पष्ट झाले आहे.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Jun 4, 2014, 07:12 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली
केंद्रीय ग्रामीणविकास मंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंडे यांचे हृदय बंद पडल्याने मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यांना हार्ट अॅटॅक आलेला नाही तर त्यांना अंतर्गत झालेल्या जखमेमुळे त्यांचा मृत्यू झाल्याचे पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये स्पष्ट झाले आहे.
अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थान चिकित्सक डॉ. अमित गुप्ता यांनी याबाबत माहिती दिली आहे. पोस्टमार्टम रिपोर्ट दिल्ली पोलिसांना पाठविण्यात आला आहे. यामध्ये म्हटले आहे की, हृदयविकाराच्या झटक्याने मुंडे यांचा मृत्यू झाला नाही. त्यांना अंतर्गत झालेल्या दुखापतीमुळे मृत्यूचे कारण आहे.
प्रवास करताना सीटबेल्ट बांधला असता, तर गोपीनाथ मुंडे अपघातात बचावले असते अशी भावना आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी व्यक्त केली आहे.
दरम्यान, अंतिम संस्कारानंतर परळीत कार्यकर्ते संतप्त झालेत. त्यांनी मुंडे यांच्या अपघाताची सीबीआय चौकशीची मागणी केली आहे. त्याचवेळी त्यांनी राजकीय नेते आणि मंत्र्यांच्या गाड्या रोखल्या. तर पोलिसांची गाडीही पेटवून देण्यात आली. यावेळी दगडफेक करण्यात आलीय.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.