www.24taas.com, नवी दिल्ली
गीतिका शर्माच्या आत्महत्याप्रकरणात महिला आय़ोगाकडील माहितीनुसार गीतिकावर अनैसर्गिक पद्धतीचं लैंगिक शोषण झालं असल्याची माहिती पुढे आली आहे.याशिवाय गोपाल कांडा आंबटशौकीनपणाची माहितीही समोर येत आहे.कांडाच्या इतरही अनेक गैरबाबी पोलिस तपासणीत पुढे आल्या आहेत.पण या गोष्टींचा तपशील इतक्यात जाहीर करणार नसल्याचं पोलिसांकडून सांगण्यात आलं आहे.
माजी मंत्री एसणाऱ्या गोपाल कांडाने अरुणा चढ्ढा,खुशबू शर्मा आणि गीतिका शर्मा यांच्या संयुक्त नावाने ए.के.जी. नावाची कंपनी सुरू केली होती. २०१२ मध्ये म्हणजे याच वर्षी बनविलेल्या कंपनीत अरुणा,खुशबू आणि गीतिकाला या कंपनीचे डायरेक्टर केलं होतं.
गोपाल कांडांचं हे `महिला कांड` इथेच संपत नाही.त्याने आपल्या लहान-मोठ्या ३९ कंपन्यांमध्ये २० महिलांना डायरेक्टरपद बहाल केलं होतं.दहा वर्षांपूर्वी २००२ मध्येही कांडाने एल.के.जी. बिल्डर्स प्रायवेट लि. पहिली कंपनी स्थापन केली. त्यात गोपाळ कांडा आणि त्याचा भाऊ संचालक होते.यानंतर गोपाल कांडाने आपल्या नातेवाईक,ओळखीच्या आणि मैत्रिणी यांच्या लहान-मोठ्या ३९ कंपन्यांमध्ये २० महिलांना संचालकपद दिले होते.