खुशखबर, देशात चांगल्या पावसाचे संकेत

देशात मागील दोन वर्षापासून पावसाचं प्रमाण अत्यल्प झालं आहे, देशात दुष्काळ सदृश्य परिस्थिती आहे, या परिस्थितीचा सरकारकडून सामना करण्याआधीच, चांगला पाऊस होण्याचे अंदाज बांधले जात आहेत.

Updated: Apr 11, 2016, 06:56 PM IST
खुशखबर, देशात चांगल्या पावसाचे संकेत title=

नवी दिल्ली : देशात मागील दोन वर्षापासून पावसाचं प्रमाण अत्यल्प झालं आहे, देशात दुष्काळ सदृश्य परिस्थिती आहे, या परिस्थितीचा सरकारकडून सामना करण्याआधीच, चांगला पाऊस होण्याचे अंदाज बांधले जात आहेत.
    
खुशखबर...
कृषी सचिव शोभना पटनाईक यांनी दिलेल्या माहितीनुसार, देशात गेल्या दोन वर्षांच्या मॉन्सूनमधील तुटीनंतर यंदा चांगला पाऊस होण्याचे संकेत आहेत. त्यामुळे राज्यांनी जूनमध्ये सुरू होणाऱ्या खरीप हंगामात भरघोस उत्पादन घेण्यासाठी नियोजन करावे. अल-निनोची स्थिती कमी झाली आहे. ला-निनो स्थिती निर्माण होण्याची शक्‍यता असल्याने मॉन्सून चांगला राहण्यास ही परिस्थिती पूरक आहे.

शेतकरी प्रचंड अडचणीत
मागील दोन वर्षांत शेतकरी अडचणीत आला आहे आणि मातीत ओलाव्याचा अभाव आहे. फेब्रुवारी महिन्यात प्रसिद्ध झालेल्या आर्थिक अहवालातही यंदा अल-निनोचा प्रभाव कमी झाल्याचे स्पष्ट केले आहे. तसेच केंद्र सरकारही त्यादृष्टीने तयार आहे, असेही पटनाईक यांनी या वेळी सांगितले.

पुढील महिन्यात अंदाज जाहीर होणार
हवामान विभाग पुढील महिन्यात अंदाज जाहीर करेल, तेव्हा पूर्ण परिस्थिती समोर येईल. मागील वर्षी मॉन्सून 14 टक्के कमी झाला आहे, लागोपाठ दोन वर्षांत मॉन्सूनमध्ये तूट पडल्याने देशात मोठ्या प्रमाणात पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे. खरीप नियोजनासाठी दिल्ली येथे आयोजित 2016-17 च्या आयोजित राष्ट्रीय परिषदेत पटनाईक बोलत होत्या.