तीन दिवसांनंतर सोन्याच्या दरात घसरण, मात्र चांदी तेजीत

गेल्या तीन दिवसांपासून सुरु असलेल्या सोन्याच्या दरातील तेजीला अखेर ब्रेक लागलाय. दिल्लीच्या सराफा बाजारात सोन्याच्या दरात आज ३० रुपयांची घसरण होत ते प्रतिग्रॅम २८,६०० रुपयांवर बंद झाले. 

Updated: May 16, 2017, 05:48 PM IST
तीन दिवसांनंतर सोन्याच्या दरात घसरण, मात्र चांदी तेजीत title=

नवी दिल्ली : गेल्या तीन दिवसांपासून सुरु असलेल्या सोन्याच्या दरातील तेजीला अखेर ब्रेक लागलाय. दिल्लीच्या सराफा बाजारात सोन्याच्या दरात आज ३० रुपयांची घसरण होत ते प्रतिग्रॅम २८,६०० रुपयांवर बंद झाले. 

याआधी गेल्या तीन दिवसांपासून सोन्याच्या दरात वाढ झाली होती. सोन्याच्या दरात घसरण झाली असली तरी चांदीचे दर मात्र वाढलेत. चांदीच्या दरात ४०० रुपयांची वाढ होत ते प्रति किलो ३८,९०० रुपयांवर बंद झालेत. 

दिल्लीत ९९.९ आणि ९९.५ टक्के शुद्धतेच्या सोन्याचे दर आज अनुक्रमे २८,६०० आणि २८,४५० रुपयांवर बंद झाले. गेल्या तीन दिवसांत सोन्याचे दर २३० रुपयांनी वाढले होते.