सोन्याच्या दरात पुन्हा घट, चांदीही झाली स्वस्त

सोन्याच्या दरात पुन्हा एकदा घसरण झालीये. खरेदीचे प्रमाण घटल्याने याचा परिणाम सोन्याच्या दरावर झालाय. 

Updated: Jan 9, 2017, 04:13 PM IST
सोन्याच्या दरात पुन्हा घट, चांदीही झाली स्वस्त title=

नवी दिल्ली : सोन्याच्या दरात पुन्हा एकदा घसरण झालीये. खरेदीचे प्रमाण घटल्याने याचा परिणाम सोन्याच्या दरावर झालाय. 

दिल्लीच्या बाजारामध्ये सोन्याचे दर 40 रुपयांनी घटलेत. सोन्याच्या दरात प्रतितोळा 40 रुपयांची घट होत हे दर 28 हजार 700 रुपयांवर पोहोचलेत. 

99.9 टक्के आणि 99.5 टक्के शुद्धतेच्या सोन्याचे दर प्रतितोळा अनुक्रमे 28,700 आणि 28,500वर पोहोचलेत. सोन्याच्या दरातील घसरणीसह चांदीच्या दरातही घसरण पाहायला मिळते. 

दिल्लीच्या सराफा बाजारात चांदीच्या दरात 50 रुपयांची घसरण होत ते प्रतिकिलो 40 हजार 400वर पोहोचलेत. याआधी शनिवारी सोन्याच्या दरात 30 रुपयांची वाढ झाली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गेल्या वर्षी नोटाबंदी जाहीर केल्यानंतर सोन्याच्या दरात मोठी घसरण होत होती. नोटाबंदीमुळे सोन्याच्या खरेदीवरही मोठा परिणाम पाहायला मिळाला.