सोन्या-चांदीच्या दरात घसरण

आंतरराष्ट्रीय बाजारात तेजीचे वातावरण असतानाही स्थानिक बाजारांतील मागणी घटल्याने शुक्रवारी सोन्या-चांदीच्या दरात घसरण झाली. 

Updated: May 21, 2016, 12:20 PM IST
सोन्या-चांदीच्या दरात घसरण title=

मुंबई : आंतरराष्ट्रीय बाजारात तेजीचे वातावरण असतानाही स्थानिक बाजारांतील मागणी घटल्याने शुक्रवारी सोन्या-चांदीच्या दरात घसरण झाली. 

सोन्याचे दर ५० रुपयांनी कमी होऊन प्रतिग्रॅम २९ हजार ७५० रुपयांवर पोहोचले. तसेच चांदीच्या दरात ५०० रुपयांची घसरण होत ते प्रतिकिलो ३९ हजार ९५०वर पोहोचले.

फेडरल रिझर्व्ह बँकेकडून व्याजदर कपातीची शक्यता असल्याने आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याने तीन आठवड्यांचा नीचांकी स्तर गाठला आहे. 

दिल्लीत ९९.९ टक्के व ९९.५ टक्के शुद्धतेच्या सोन्याचा दर ५० रुपयांनी कमी होऊन अनुक्रमे २९,७५0 रुपये व २९,६00 रुपये इतका राहिला.