नवी दिल्ली : दिल्लीच्या सराफा बाजारात सलग पाचव्या दिवशी सोन्याच्या दरात घसरण पाहायला मिळाली. शुक्रवारी सोन्याच्या दरात ४०० रुपयांनी घसरण होत ते २९ हजाराहून कमी दरांवर आले.
आज सोन्याच्या दरात घसरण होत ते प्रतितोळा २८,८५० रुपयांवर स्थिरावले. ७ जानेवारीला २०१७नंतर सोन्याने गाठलेला हा नीचांक आहे. गेल्या पाच दिवसांत सोन्याच्या दरात १२५० रुपयांनी घसरण झालीये.
सोन्यासह चांदीच्या दरातही ५२५ रुपयांची घसरण पाहायला मिळाली. शुक्रवारी दिल्लीत सोन्याचे दर प्रतिकिलो ५२५ रुपयांनी कमी होत ते ४०,९७५ रुपयांवर घसरले.
दिल्लीत ९९.९ आणि ९९.५ टक्के शुद्धतेचे दर प्रतितोळा अनुक्रमे २८,८५० आणि २८,७०० रुपयांवर बंद झाले.