सलग दुसऱ्या दिवशी सोन्याच्या किंमतीत घट

शनिवारी सलग दुसऱ्या दिवशी सोन्याच्या किंमतीत घट झालीय. आंतरराष्ट्रीय स्तरावर सोन्याच्या किंमती घसरल्यामुळे आज किंमतीमध्ये 160 रुपयांनी घसरण झालीय. 

Updated: May 2, 2015, 10:43 PM IST
सलग दुसऱ्या दिवशी सोन्याच्या किंमतीत घट title=

नवी दिल्ली : शनिवारी सलग दुसऱ्या दिवशी सोन्याच्या किंमतीत घट झालीय. आंतरराष्ट्रीय स्तरावर सोन्याच्या किंमती घसरल्यामुळे आज किंमतीमध्ये 160 रुपयांनी घसरण झालीय. 

घसरणीनंतर सोन्याची किंमत 27,030 रुपये प्रती 10 ग्रॅमवर पोहचलीय. पण, याच्या उलट म्हणजे चांदीच्या किंमतीत वाढ झालीय. चांदीच्या किंमतीत 510 रुपयांनी वाढ होऊन चांदी 37,210 रुपये प्रती किलोग्रॅमवर पोहचलीय. 
 
आंतरराष्ट्रीय बाजारात फेडरल रिझर्व्ह बँकेनं अमेरिकन व्याज दर वाढविण्याच्या दृष्टीने पाऊल उचलल्यानं सोनं गेल्या सहा आठवड्यांच्या निम्न स्तरावर पोहचलंय. त्यामुळे, घरगुती बाजारातही सोन्याच्या किंमतींवर प्रभाव दिसून आला. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.