सोन्याच्या किंमती पडल्या, चांदीही घसरली!

 जागतिक पातळीवर ‘स्टाकिस्टां’मुळे दिल्ली सराफा बाजारात सोन्याचे भाव गडगडलेत.

Updated: Jul 22, 2014, 01:38 PM IST
सोन्याच्या किंमती पडल्या, चांदीही घसरली! title=

नवी दिल्ली : जागतिक पातळीवर ‘स्टाकिस्टां’मुळे दिल्ली सराफा बाजारात सोन्याचे भाव गडगडलेत.

दोन दिवसांच्या उसळीनंतर शनिवारी 50 रुपयांनी घसरून सोन्याच्या किंमती 28,450 रुपये प्रति दहा ग्रॅमवर येऊन पोहचला होता. स्थानिक बाजारात आज सोन्याचा भाव आहे, 28,108 रुपये.

तसंच, औद्योगिक क्षेत्र आणि नाणे निर्मात्यांकडून कमी मागणीमुळे चांदीचे भावही 350 रुपयांनी खाली घसरून 45,150 रुपये किलो होते.  

न्यूयॉर्कमध्ये सोन्याच्या किंमतीत 0.6 टक्के घट होऊन 1309.40 डॉलर आणि चांदीचे भाव 1.2 टक्क्यांनी घसरून 20.88 डॉलर प्रति औंसवर येऊन ठेवलेत.   

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.