www.24taas.com, झी मीडिया, गोवा
गोव्यातील शिक्षण हायटेक करण्यासाठी राज्य सरकारनं कंबर कसलीय. याचाच एक भाग म्हणून आता गोव्यातील शाळांमधून वह्या-पुस्तकं बाद होणार आहेत.
गोव्यातील शाळांमध्ये पुढील महिन्यापासून पाचवी आणि सहावीतील सर्व विद्यार्थ्यांना ई-नोटबुकवरून शिकवण्यात येणार आहे. त्यामुळे वह्या, पुस्तके बाद करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी दिली. गोवा राज्याने शिक्षणामध्ये ई-क्रांती घडविण्यासाठी महत्त्वपूर्ण पाऊल टाकलंय.
गोवा राज्याने संगणकाचे शिक्षण विद्यार्थ्यांना बालवयापासूनच देण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी विद्यार्थ्यांना ५०० हजार ई-नोटबुक वाटण्यात येणार आहेत. यासाठी पाचवी आणि सहावीच्या विद्यार्थ्यांची निवड करण्यात येणार आहे.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.