पर्यटकांनो गोव्यात नवा प्रवेशकर लागू होणार....

गोव्यात आता जर तुम्ही पर्यटनासाठी जात असाल तर तुमच्या खिशाला काहीसा भार सहन करावा लागणार आहे.

Updated: Jan 31, 2013, 04:02 PM IST

www.24taas.com, पणजी
गोव्यात आता जर तुम्ही पर्यटनासाठी जात असाल तर तुमच्या खिशाला काहीसा भार सहन करावा लागणार आहे. कारण गोवा सरकारनं बाहेरून येणा-या पर्यटकांवर आणि व्यावसायिक वाहनांवर प्रवेश कर आकारण्याचा निर्णय घेतलाय. जीप कार, पिकअप व्हॅन साठी 250 रुपये, बसेस ट्रक इत्यादींसाठी 500 रुपये तर अवजड वाहनांना 1000 रुपये कर भरावा लागणार आहे.
हा कर भरण्यासाठी गोवा सरकारनं 7 सीमांवर टोलनाके उभारण्याचं ठरवलंय. गोव्यामध्ये साधारणपणे प्रती लिटर 20 रुपये तर डिझेल 4 रुपयांनी स्वलस्त आहे. त्यामुळे राज्याच्या तिजोरीवर मोठा भार पडतोय मात्र आता या नव्या निर्णयामुळे सरकारच्या महसूलात 100 कोटींची भर पडणार आहे...
पर्यटक आणि चारचाकी व्यावसायिक वाहनांवर प्रवेश कर आकारण्याचा गोवा सरकारने निर्णय घेतल्याने पर्यटकांच्या खिशाला चाट पडणार आहे. या प्रवेशकरामुळे सरकारच्या महसूलात पडणार 100 कोटींची भर पडणार आहे. पेट्रोल डिझेल स्वस्त असल्याने सरकारी तिजोरीवर मोठा भार पडला आहे. नव्या करामुळे सरकारवरील भार कमी होण्यास मदत होणार आहे.