गोवा सावर्डे पूल दुर्घनेत दोघांचा मृत्यू, ३५ जणांना वाचविण्यात यश

गोव्यातील सावर्डे पूल दुर्घटनेत आतापर्यँत दोन जणांचा मृत्यू झाला. ३५ जणांना वाचवण्यात यश आले आहे. मात्र, बेपत्ता लोकांचा शोध घेणे सुरुच आहे. 

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: May 19, 2017, 11:45 AM IST
गोवा सावर्डे पूल दुर्घनेत दोघांचा मृत्यू, ३५ जणांना वाचविण्यात यश title=

पणजी : गोव्यातील सावर्डे पूल दुर्घटनेत आतापर्यँत दोन जणांचा मृत्यू झाला. ३५ जणांना वाचवण्यात यश आले आहे. मात्र, बेपत्ता लोकांचा शोध घेणे सुरुच आहे. 

घटनास्थळी सकाळपासून पुन्हा शोध मोहीम सुरू झाली आहे. सावर्डे येथील नदीच्या पुलावरून एका तरुणाने आत्महत्या केली होती. या तरुणाच्या शोधासाठी अग्निशमन दल आणि नेव्हीची टीम या ठिकाणी दाखल झालेली होती. यावेळी या ब्रिटीशकालीन पादचारी पुलावर बघ्यांची मोठी गर्दी झाली. जास्त वजनानं पूल तुटल्यानं ४५ ते ५० जण सावर्डे नदीत कोसळले. ३५ जणांना वाचवण्यात यश आलंय.  

या व्यक्तिंना वाचविण्यात यश

- बहादूर हळदणकर, २९, गांधीनगर
- मुशकी मोहन, ४०, टोननगर सावर्डे
- नवदीप गायक, २२, पंचवाडी
- गणपत बिमानी, ३६, कापशे
- शेखर नाईक, ४८, दाढें
- मुरुजू शेख, १८,  कुडचडे
- साजित शेख, २४, टोनीनगर सावर्डे
- मनोज रायकर, ४०, मळकर्णे
- विठ्ठल दाणी, ३५, सावर्डे

रुग्णालयात दाखल व्यक्ती

- राजाराम गायक, ४५, पंचवाडी
- महादेव उपेंद्र, ४३, बॅग शिरफोड
- मुर्तुजा किलगिरी, ४०, बागवाडा
- लतीफ शेख, ५५, टोनीनगर
- रमेश कुमार, २३, म्हापा