मुलीचा आरोप आईच करायची लैंगिक शोषण

सगळ्या देशाचे लक्ष शीना बोरा हत्याकांडाकडे असताना एका आईचे कारनामे ऐकून तुम्ही हैराण व्हाल. दिल्लीत अशीच एक धक्कादायक घटना पुढे आली आहे. राजधानी दिल्लीत बड्या कॉलेजमध्ये शिकणाऱ्या तरुणीने आपल्या आईवर गंभीर आरोप केलाय. आईच आपले लैंगिक शोषण करीत होती, असे या कॉलेज विद्यार्थीनीने म्हटलेय.

Updated: Aug 29, 2015, 11:22 PM IST
मुलीचा आरोप आईच करायची लैंगिक शोषण    title=

नवी दिल्ली : सगळ्या देशाचे लक्ष शीना बोरा हत्याकांडाकडे असताना एका आईचे कारनामे ऐकून तुम्ही हैराण व्हाल. दिल्लीत अशीच एक धक्कादायक घटना पुढे आली आहे. राजधानी दिल्लीत बड्या कॉलेजमध्ये शिकणाऱ्या तरुणीने आपल्या आईवर गंभीर आरोप केलाय. आईच आपले लैंगिक शोषण करीत होती, असे या कॉलेज विद्यार्थीनीने म्हटलेय.

या घटनेची माहिती पीडित मुलीने न्यायालयात न्यायची मागणी करताना दिली. न्यायालयाला तिने सांगितले, आई अनेकवेळा माझा छळ करीत असे तसेच ती सेक्सही करायची. पोलिसांनी न्यायालयाच्या आदेशानंतर लैंगिक शोषण आणि कौटुंबीक हिंसा कायद्याच्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पीडित मुलीने मेल टुडेला दिलेल्या माहितीनुसार मी लहान असल्यापासून मला आई-वडील मानसिक आणि शाररिक त्रास देत आली आहेत. मला वाटते लहान मुलांना मारणे सर्वसामान्य गोष्ट आहे. ज्यावेळी मी सीनिअर स्कूलमध्ये गेली त्यावेळी मला आईचा हेतू स्पष्ट धान्यात येऊ लागला. मला रात्री आई अंधारात स्पर्श करायची. माझ्या प्रायवेट पार्टला हात लावयची. विरोध केला तर ती ओरडायची. मला बाहेर जाऊ द्यायची नाही. मला कॉलेज कार्यक्रमात भाग घेण्यास मज्जाव करु लागली. तसेच माझ्या शिक्षकांनाही तसे बजावले होते.

मी जशी मोठी होत गेली तशी आईचे चाळे अधिक वाढले. माझ्या खोलीत येऊन ती प्रायव्हेट पार्टला हात लावण्याचा प्रयत्न करायची. त्यावेळी मी तिला ढकलून पोलीस स्टेशन गाठले. मी तक्रार देण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी पोलिसांनी विश्वास ठेवला नाही. मला स्टेशनमधून हाकलून दिले, असे पीडित मुलीने सांगितले.

त्यानंतर तिने न्यायालयाचे दरवाजे ठोठावले. त्यानंतर न्यायालयाने आदेश दिले आणि पोलिसांनी तिच्या आईविरोधात गुन्हा दाखल केलाय. पोलीस अधिक तपास करीत आहेत. दरम्यान, पीडित मुलीच्या आईने आरोप फेटाळून लावलेत.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*   झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.