हॉस्पिटलमध्ये महिलेवर सामूहिक बलात्कार

रुग्णालयात महिलेवर हॉस्पिटलमध्ये दोघांनी सामूहिक बलात्कार केल्याची घटना घडली आहे मेवात येथील सरकारी हॉस्पिटलची ही घटना आहे.

Updated: Jun 9, 2016, 12:07 AM IST
हॉस्पिटलमध्ये महिलेवर सामूहिक बलात्कार title=

गुडगाव : रुग्णालयात महिलेवर हॉस्पिटलमध्ये दोघांनी सामूहिक बलात्कार केल्याची घटना घडली आहे मेवात येथील सरकारी हॉस्पिटलची ही घटना आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मेवात येथील एसएचकेएम सरकारी रुग्णालयात एक 22 वर्षीय महिला उपचारासाठी दाखल झाली होती.

रुग्णालयातील वॉर्ड बॉय आणि सुरक्षारक्षकाने सोमवारी रात्री महिलेला एका मोकळ्या खोलीत नेऊन सामूहिक बलात्कार केला. दोघा संशयितांना अटक करण्यात आली आहे.

पीडित महिलेच्या नातेवाइकांच्या दोन तासानंतर ही घटना उघडकीस आली. रात्री एकच्या सुमारास नातेवाइकांनी पोलिसांशी संपर्क साधला.