आंतरराष्ट्रीय खेळाडूच्या पत्नीवर १२ दिवस सामूहिक बलात्कार

एका आंतरराष्ट्रीय खेळाडूच्या मूकबधिर पत्नीवर तब्बल बारा दिवस सामूहिक बलात्कार झाल्याची घटना उघडकीस आलीय.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Dec 1, 2013, 12:39 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, मेरठ
एका आंतरराष्ट्रीय खेळाडूच्या मूकबधिर पत्नीवर तब्बल बारा दिवस सामूहिक बलात्कार झाल्याची घटना उघडकीस आलीय.
पीडित महिला आपल्या माहेरी आली असताना तिच्यावर हा प्रसंग ओढावला. ही घटनेसंबंधी तिच्या माहेरच्या व्यक्तींना माहिती असूनदेखील बदनामी होईल या भीतीनं त्यांनी ही घटना लपवून ठेवण्याचा प्रयत्न केला. संबंधित महिलेची तब्येत बिघडल्याचं सांगत त्यांनी तिच्या शूटर पतीला थापा मारल्या.
या आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळणाऱ्या खेळाडूचं सासर मेरठमध्ये आहे. ९ ऑगस्ट रोजी त्याची पत्नी आपल्या माहेरी आली होती. तिच्यासोबत तिचा दीड वर्षांचा मुलगादेखील होता. २५ ऑगस्ट रोजी तो सासरी दाखल झाला तेव्हा त्याच्या पत्नीची तब्येत बिघडली होती. सासरच्या लोकांनी दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला परंतु, आपल्या अपंग पत्नीकडून त्याला या घटनेबद्दल समजलं. बोलता न येणाऱ्या आणि ऐकू न येणाऱ्या त्याच्या पत्नीनं खुणेनंच कुटुंबीयांच्या अनुपस्थितीत काही तरुणांनी घरात घुसून आपल्यावर अत्याचार केल्याचं त्याला सांगितलं. हा प्रकार १२ ऑगस्टपासून सुरू होता. या दरम्यान २० हून अधिक जण घरात दाखल झाले होते. परंतु, महिला कुणाचीही नावं सांगू शकली नाही.
घटनेसंबंधी समजल्यानंतर खेळाडू आपल्या घाबरलेल्या पत्नीला मनोवैज्ञानिकांकडे घेऊन गेला. १८ नोव्हेंबर रोजी त्यानं एम्समध्ये आपल्या पत्नीला दाखल केलं. तिथं तिच्यावर झालेल्या लैंगिक अत्याचाराला पृष्टी मिळाली. त्यानंतर खेळाडूनं या घटनेसंबंधी पोलिसांत तक्रार दाखल केलीय.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.