पणजी : गोव्याचे मुख्यमंत्री म्हणून मनोहर पर्रिकर यांनी शपथ घेतली, पण मुख्यमंत्रीपदाची शपथ घेताना पर्रिकर यांनी मुख्यमंत्री या शब्दाऐवजी मंत्री हा शब्द उच्चारला. नितीन गडकरींनी ही गोष्ट पर्रिकरांना सांगितली आणि मग त्यांनी मुख्यमंत्री हा शब्द वापरून शपथ घेतली.
खरंतर गोव्यामध्ये काँग्रेसला सर्वाधिक जागा मिळाल्या असतानाही भाजपनं सत्ता स्थापन केली. भाजपच्या या सत्तास्थापनेमध्ये नितीन गडकरींचा निकाल लागल्यापासून महत्त्वाचा वाटा होता. निकाल लागला त्या दिवसापासून गडकरी हे गोव्यात तळ ठोकून बसले होते.
गोव्यामधल्या मगोप, गोवा फॉरवर्ड आणि अपक्ष आमदारांबरोबर चर्चा करून गडकरींनी गोव्यात पुन्हा एकदा भाजपची सत्ता तर आणलीच पण शपथविधीच्या दिवशीही गडकरींनीच पर्रिकरांना शब्दश: गोव्याचं मुख्यमंत्री बनवलं.