नव्या सरकारच्या हाती कॅम्पाकोलावासियांचं भविष्य

नवं सरकार तयार असेल तर कॅम्पाकोला सोसायटीला नियमित करण्याबाबत विचार करू असं सांगत सुप्रीम कोर्टानं  कॅम्पाकोलावासियांना तात्पुरता दिलासा दिला आहे. त्यामुळं कॅम्पाकोलावासियांचं भविष्य आता नव्या सरकारच्या हातात आहे. दरम्यान याप्रकरणाची सुनावणी एका आठवड्यासाठी पुढं ढकलण्यात आली आहे. 

Updated: Oct 27, 2014, 04:06 PM IST
नव्या सरकारच्या हाती कॅम्पाकोलावासियांचं भविष्य title=
सौजन्य डीएनए

नवी दिल्ली: नवं सरकार तयार असेल तर कॅम्पाकोला सोसायटीला नियमित करण्याबाबत विचार करू असं सांगत सुप्रीम कोर्टानं  कॅम्पाकोलावासियांना तात्पुरता दिलासा दिला आहे. त्यामुळं कॅम्पाकोलावासियांचं भविष्य आता नव्या सरकारच्या हातात आहे. दरम्यान याप्रकरणाची सुनावणी एका आठवड्यासाठी पुढं ढकलण्यात आली आहे. 

अनधिकृत बांधकाम केल्यामुळं सुप्रीम कोर्टानं कॅम्पाकोला सोसायटीतील इमारतींचे अनधिकृत मजले पाडून टाकण्याचे आदेश दिले होते, मात्र रहिवाशांनी या निर्णयाला कडाडून विरोध केला होता. त्यानंतर रहिवासी आणि न्यायालयादरम्यान संघर्ष सुरू झाला होता. 

मात्र आता नवे सरकार स्थापन होत असून सरकारची परवानगी असल्यास इमारतीबाबत विचार करू असं सुप्रीम कोर्टानं सांगितल्यानं रहिवाशांना दिलासा मिळाला आहे. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.