नव्या वर्षाला ‘फ्री रोमिंग’चं गिफ्ट!

पुढल्या वर्षीपासून देशभरात रोमिंग चार्जेस काढून टाकण्यात येतील, असं दूरसंचारमंत्री कपिल सिब्बल यांनी स्पष्ट केलंय.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Sep 24, 2012, 04:05 PM IST

www.24taas.com, नवी दिल्ली
पुढल्या वर्षीपासून देशभरात रोमिंग चार्जेस काढून टाकण्यात येतील, असं दूरसंचारमंत्री कपिल सिब्बल यांनी स्पष्ट केलंय. केंद्रीय अर्थ मंत्रालयाला याबाबतची माहिती दिल्याचं त्यांनी यावेळी सांगितलंय.
नवी दिल्लीत होत असलेल्या `इंटरनेट गव्हर्नन्स कॉन्फरन्स`मध्ये सहभागी होण्यासाठी सिब्बल आले होते. त्यावेळी पत्रकारांनी त्यांना प्रश्न विचारला होता. मे महिन्यात मंत्रीमंडळानं मंजूरी दिलेल्या नव्या टेलिकॉम धोरणामध्ये रोम फ्री मोबाईलची शिफारस करण्यात आली होती. राष्ट्रीय दूरसंचार धोरण २०१२ अंतर्गत देशभरातून रोमिंग चार्जेस हटविण्याचा निर्णय घेण्यात आला होता. यामुळे मोबाईल धारक ग्राह देशभरात एकच नंबर वापरू शकतील तसंच आपल्या दूरसंचार सर्कलच्या बाहेर गेल्यास त्यावर अतिरिक्त शुल्काचा भूर्दंडही त्यांना बसणार नाही. दरम्यान, दूरसंचार सचिव आर. चंद्रशेखर यांनी दूरसंचार विभाग स्पेक्ट्रम वाटपाच्या लिलावासाठी लवकरच जाहीर करणा-या आमंत्रण पत्रिकेवर काम करित असल्याची माहिती दिलीय.

सध्या, ग्राहकांना वेगवेगळ्या राज्यात गेले की, रोमिंग चार्जेस द्यावा लागतो. देशात खासगी वेगवेगळ्या कंपन्या असल्याने त्यांच्या नेटवर्कचा वापर केला की, रोमिंग चार्जेस द्यावा लागतो. ग्राहकाला आपल्या राज्यातून इतर राज्यात जावे लागले की इतर नेटवर्कचा वापर करावा लागतो.