माजी पंतप्रधान इंद्रकुमार गुजराल यांचे निधन

माजी पंतप्रधान इंद्रकुमार गुजराल (वय ९३) यांचे आज निधन झाले. ते गेल्या अनेक दिवसांपासून आजारी होते.

Prashant Jadhav प्रशांत जाधव | Updated: Nov 30, 2012, 04:13 PM IST

www.24taas.com, नवी दिल्ली
माजी पंतप्रधान इंद्रकुमार गुजराल (वय ९३) यांचे आज निधन झाले. ते गेल्या अनेक दिवसांपासून आजारी होते.

गुजराल यांच्यावर गुरगावमधील मेदांता हॉस्पीटलमध्ये उपचार सुरु होते. तेथे त्यांना मागील काही दिवसापासून व्हेंटिलिटरवर ठेवण्यात आले होते. गुजराल यांना फुफ्फुसाचा संसर्ग झाल्याने १९ नोव्हेंबरपासून रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेव्हापासूनच गुजराल यांची प्रकृती गंभीर होती. ते औषधोपचारांनाही प्रतिसाद देत नव्हते
इंद्रकुमार गुजराल हे देशाचे १२ वे पंतप्रधान होते. एप्रिल १९९७ ते मार्च १९९८ या कालावधीत त्यांनी देशाचे पंतप्रधानपद भूषवले होते. १९४२ मध्ये भारत छोडो आंदोलना दरम्यान जेलमध्येही गेले होते. १९७६ ते ८० या कालावधीत ते सोव्हियत रशियात भारताचे राजदूत म्हणून कार्यरत होते. १९८८मध्ये काँग्रेसचा राजीनामा देऊन त्यांनी जनता दलात प्रवेश केला. १९८९ मध्ये व्ही.पी.सिंग सरकारमध्ये परराष्ट्र मंत्री होते.