माजी केंद्रीय मंत्र्यांने उचलली राहुल गांधींची चप्पल

पक्षाच्या मोठ्या नेत्यावर निष्ठा एवढी की त्यांनी चक्क राहुल गांधींची चप्पल हातात उचलून त्यांच्या पायात घालायला दिली. हि घटना काही पहिल्यांदा तामिळनाडूमध्ये घटलेली नाही. याआधी महाराष्ट्रातील तेव्हाच्या गृह राज्यमंत्र्यांनेही अशीच निष्ठा दाखवली होती. तेव्हा ही रमेश बागवे यांच्यावर अनेकांकडून टीका करण्यात आली होती.

Updated: Dec 9, 2015, 04:36 PM IST
माजी केंद्रीय मंत्र्यांने उचलली राहुल गांधींची चप्पल title=

पदुचेरी : पक्षाच्या मोठ्या नेत्यावर निष्ठा एवढी की त्यांनी चक्क राहुल गांधींची चप्पल हातात उचलून त्यांच्या पायात घालायला दिली. हि घटना काही पहिल्यांदा तामिळनाडूमध्ये घटलेली नाही. याआधी महाराष्ट्रातील तेव्हाच्या गृह राज्यमंत्र्यांनेही अशीच निष्ठा दाखवली होती. तेव्हा ही रमेश बागवे यांच्यावर अनेकांकडून टीका करण्यात आली होती.

मंगळवारीही तामिळनाडूमध्ये एका माजी केंद्रीय मंत्र्यांने असाच कारनामा केला आहे. ज्याचा व्हिडिओ व्हायरल होताच माजी केंद्रीय मंत्री आणि काँग्रेसचे कायदे सल्लागार व्ही नारायणसामी चांगलेच चर्चेत आले आहे. 

राहुल गांधी मंगळवारी तामिळनाडूमध्ये पुरामुळे नुकसान झालेल्या भागाचा दौरा करण्यासाठी पुडुचेरी येथे गेले होते. या दरम्यान त्यांनी बचाव कार्यात गती आणण्याची मागणी केली. त्या दरम्यान व्ही नारायणसामी हातात चप्पल घेऊन राहुल गांधींना देतांना दिसले. त्यानंतर त्यांच्यावर प्रचंड टीका होऊ लागली.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.