www.24taas.com , झी मीडिया, रांची
३७.७० कोटींच्या चाराघोटाळा प्रकरणी राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष आणि माजी रेल्वेमंत्री लालू प्रसाद यादव यांच्यासह ४५ जणांना विशेष कोर्टानं दोषी ठरवलंय. मात्र याप्रकरणी आरोपींना शिक्षा कोर्ट आता ३ ऑक्टोबरला सुनावणार आहे.
लालूंवरील आरोपांनुसार याप्रकरणी त्यांना तीन ते सात वर्षाची शिक्षा होऊ शकते. लालूंचं संसदेतलं सदस्यत्वही रद्द झालंय. ज्यांना तीन वर्षांहून अधिक शिक्षा सुनावल्या जाणार त्यांना ३ ऑक्टोबरला शिक्षा सुनावण्यात येणार आहे. मात्र ज्यांनी तीन पेक्षा कमी शिक्षा आहे, त्यांना कोर्टानं आज शिक्षा सुनावलीय. याचाच अर्थ लालूप्रसाद यादव यांना तीन वर्षांहून अधिक शिक्षा सुनावली जाणार.
लालूंसोबतच जगन्नाथ मिश्र यांनाही दोषी ठरवण्यात आलंय. जनता दल यूनायटेडनं कोर्टाच्या या निर्णयाचं स्वागत केलंय.
या खटल्याची सुनावणी १७ सप्टेंबरलाच पूर्ण झालीय़. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार या प्रकरणात लालू प्रसाद दोषी आढळल्यास त्यांची खासदारकी रद्द होऊ शकते. त्यामुळं आजचा फैसला लालूंच्या राजकीय भवितव्यासाठी महत्त्वाचा आहे. ज्या खासदारांना, आमदारांना दोन वर्षापेक्षा जास्त शिक्षा मिळेल त्यांचं सदस्यत्व रद्द होईल, हा ऐतिहासिक निर्णय निर्णय नुकताच सुप्रिम कोर्टानं दिलाय. त्यामुळं आता या निर्णयाकडे सगळ्यांचंच लक्ष लागलंय.
चारा घोटाळाप्रकरणी १९९६ मध्ये एफआयआर दाखल झाली होती. १७ वर्षानंतर याप्रकरणाचा निकाल लागणार आहे. कोर्टाच्या निकालासाठी लालू प्रसाद यादव आणि बिहारच्या माजी मुख्यमंत्र्यासहीतर इतर बहुतेक आरोपी कालच रांचीत दाखल झालेत.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.