व्हॉट्सअॅपवरच्या जोकवर हसला म्हणून गोळी मारली

झारखंडमध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. व्हॉट्सअॅपवर लोकं जोक वाचून खूप बसतात पण जर कोणी यामुळे गोळी मारली तर ? ऐकूणच धक्का लागला ना ? पण असं घडलं आहे. एका युवकाने व्हॉट्सवरील जोक वाचला आणि त्याला हसू सूटलं म्हणून त्याला एकाने गोळी मारली आहे.

Updated: Jul 12, 2016, 04:33 PM IST
व्हॉट्सअॅपवरच्या जोकवर हसला म्हणून गोळी मारली  title=

रांची : झारखंडमध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. व्हॉट्सअॅपवर लोकं जोक वाचून खूप बसतात पण जर कोणी यामुळे गोळी मारली तर ? ऐकूणच धक्का लागला ना ? पण असं घडलं आहे. एका युवकाने व्हॉट्सवरील जोक वाचला आणि त्याला हसू सूटलं म्हणून त्याला एकाने गोळी मारली आहे.

जखमी युवकाला रांचीच्या रिम्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून तो जगण्यासाठी संघर्ष करतोय. ही घटना ३ दिवसापूर्वीची आहे. पण या घटनेटा खुलासा २ दिवसांनी झाला. जखमी युवकाने म्हटलं की, तो एका हॉस्टेलमध्ये शिकतोय. ३ दिवसापूर्वी तो जेवणासाठी मित्रांसोबत गेला होता.

मित्रांसोबत जेवणासाठी गेला असतांना ही घटना घडली. तो जेथे बसला होता तेथे त्याच्या समोर २ जण बसले होते. ते २ तरुण त्याच्याकडे आले आणि म्हणाले की तू आमच्याकडे बघून हसतोय का ? य़ुवकाने नाही उत्तर दिलं. यानंतर दोघांमध्ये बाचाबाची झाली आणि त्याच्यावर एकाने गोळी झाडली. यानंतर दोन्ही आरोपी फरार झाले. पण आरोपींबाबत अजून काही पुरावा मिळालेला नाही.