श्रीनगर : जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री आणि नॅशनल कॉन्फरन्सचे नेते फारुख अब्दुल्ला यांनी श्रीनगर लोकसभा पोटनिवडणुकीत विजय मिळवला आहे. पीडीपीचे नाझीर अहमद खान यांचा त्यांनी पराभव केला आहे. या पोटनिवडणुकीत मोठ्या प्रमाणावर हिंसाचार झाला. त्यामुळे मतदारांनी मतदानाकडे पाठ फिरवली होती.
गुरुवारी २८ मतदान केंद्रावर पुन्हा फेरमतदान झालं. या मतदानात केवळ दोन टक्के मतदानाची नोंद झाली होती. जम्मू काश्मीरच्या इतिहासात प्रथमच एवढ्या कमी मतदानाची नोंद झाली. आज या निवडणुकीचा निकाल लागला असून फारुक अब्दुल्ला विजयी झाले आहेत.