नोएडा : मित्रांला रोज-रोज घरी आणणे नवऱ्याला महागात पडले. नवऱ्यांच्या गैरहजेरीत मित्राचे बायकोसोबत प्रेम प्रकरण सुरू झाले. बऱ्याच वेळा शारीरिक संबंधही निर्माण केले. त्यानंतर मित्राला फसवून त्यांच्या बायकोला घेऊन पळाला. बऱ्याच शोधानंतर बायको पोलिसांना सापडली, पण तिने नवऱ्यासोबत राहण्यास नकार दिला आहे.
पोलिसांनी नवऱ्यांच्या सांगण्यावरून बायकोचा शोधून काढले. परंतु बायकोने नवऱ्यासोबत राहण्यास नकार दिला आहे. आयुष्य भर प्रियकरासोबतच राहणार असे तिने सांगितले.
महिला कानपूरला राहणारी होती. चार वर्षापूर्वीच तिचे लग्न कनोज येथे राहणाऱ्या मुलासोबत झाले होते.
पोलिसांच्या दिलेल्या माहितीनुसार महिलाने ब्युटी पार्लरला जाते असे सांगून घरातून पळाली सोबत तीन वर्षाच्या मुलीला घेऊन सर्व नातेवाईक महिलेचा शोध घेत असतानाच नवादा या गावी राहत असल्याचे समजले.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.