दहशतवादाला खतपाणी घालणारी माहिती हटवणार

दहशतवादाला खतपाणी घालणाऱ्या बातम्या, माहिती, फोटो आणि व्हिडियोवर बंदी

Updated: Dec 7, 2016, 04:42 PM IST
दहशतवादाला खतपाणी घालणारी माहिती हटवणार title=

ब्रेसल्स : फेसबूक, ट्विटर, यूट्यूब, मायक्रोसॉफ्ट सारख्या सोशल साइटवरील दहशतवादाला खतपाणी घालणाऱ्या बातम्या, माहिती, फोटो आणि व्हिडियोवर आता बंदी घातली जाणार आहे.

सोशल साईटचा वापर करून दहशतवादी संघटना जगात मोठ्याप्रमाणावर आपली पाळमूळ घट्ट करण्याच्या प्रयत्नात आहे. भडकावणाऱ्या बातम्या, घातपाताची माहिती, हिंसक फोटो आणि रक्तरंजित व्हिडिओची माहिती लोकांमध्ये पसरवण्यासाठी सायबर स्पेसचा वापर करत आहेत. या सर्व गोष्टीवर बंदी घालण्यासाठी फेसबूक, ट्विटर सारख्या कंपन्या एकत्र येणार आहे.
 
फेसबूक, ट्विटर, यूट्यूब आणि मायक्रोसॉफ्ट या कंपन्या हिंसक दहशतवादी फोटो, दहशतवादी भरतीच्या व्हिडिओ शोधण्यासाठी आणि त्या हटवण्यासाठी एक सामायिक डेटाबेस तयार करणार आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार, डेटाबेसमध्ये फोटो, व्हिडिओला डिजिटल स्वरूपात सुचित केले जाणार आहे. त्यामुळे कंपन्याना दहशतवादी साहित्य प्रभावीपणे ओळखण्यासाठी मदत होईल.
 
इंटरनेट कंपन्या दहशतवादी संघटनेशी जोडलेल्या ऑनलाईन साहित्याचा इंटरनेटवरील प्रसार रोखण्यासाठी प्रयत्न करत आहेत. दहशतवादी संघटना इस्लामिक स्टेटचे (आईएस) समर्थक संघटनेच्या प्रचारासाठी आणि भरतीसाठी मोठ्याप्रमाणावर सोशल मिडियाचा वापर करत आहेत.
 
दहशतवादी संघटनेत भरतीसाठी सोशल मीडियाचा वापर करत असल्याच्या विषयावर जानेवारी महिन्यात कंपन्यांनी अमेरिका सरकारशी चर्चा केली आहे. ऑगस्ट महिन्यात ट्विटरने सांगितले की, दहशवादाला पाठिंबा देणारे ट्विटरवरील लाखो अकाउंटवर बंदी घालण्यात आली आहे.