वोटर आयडी कार्ड 'आधार' शी जोडणार निवडणूक आयोग

मतदान ओळखपत्राला 'आधारकार्डाशी' जोडण्याचा प्रयत्न निवडणूक आयोग करीत असल्याची माहिती सरकारतर्फे देण्यात आली आहे. यामुळे मतदाराचे दोन्ही पद्धतीने विश्वनीय सत्यापन निश्चित करता येणार आहे. त्यामुळे बोगस मतदारांची समस्या संपू शकते.

Updated: Feb 27, 2015, 07:08 PM IST
वोटर आयडी कार्ड 'आधार' शी जोडणार निवडणूक आयोग title=

नवी दिल्ली : मतदान ओळखपत्राला 'आधारकार्डाशी' जोडण्याचा प्रयत्न निवडणूक आयोग करीत असल्याची माहिती सरकारतर्फे देण्यात आली आहे. यामुळे मतदाराचे दोन्ही पद्धतीने विश्वनीय सत्यापन निश्चित करता येणार आहे. त्यामुळे बोगस मतदारांची समस्या संपू शकते.

राज्यसभेत आज प्रश्नकाळात कायदा मंत्री डी. व्ही. सदानंद गौडा यांनी ही माहिती दिली. निवडणूक आयोग सतत प्रयत्न करीत आहे की देशातील मतदार याद्या या त्रुटीमुक्त व्हायला हव्यात. मतदाराची सत्यतेबद्दल कोणत्या प्रकारची त्रुटी राहता कामा नये. 

गौडा यांनी पूरक प्रश्नांला उत्तर देताना सांगितले, निवडणूक आयोग मतदार ओळख पत्राला आधारकार्डाशी जोडण्याचा प्रयत्न करीत आहेत. यामुळे मतदाराचे दोन्ही पद्धतीने विश्वनीय सत्यापन निश्चित करता येणार आहे. त्यामुळे बोगस मतदारांची समस्या संपू शकते. 

निवडणूक आयोगानुसार मतदार यादीत क्वचितच असे खोटे नाव असेल. पण दोन ठिकाणी नावे असल्याचे प्रकार मतदार यादीत अधिक प्रमाणात आहेत. मतदाराने मतदारयादीत आपले नाव नोंदल्यानंतर आपले निवासस्थान बदलल्यावर पुन्हा त्या ठिकाणी आपल्या नाव नोंदले असेल त्यामुळे असे प्रकार अधिक दिसतात.  

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.