गोपीनाथ मुंडे यांना निवडणूक आयोगाचा दिलासा

भाजपचे नेते आणि खासदार गोपीनाथ मुंडे यांना निवडणूक आयोगाचा दिलासा मिळाला आहे. मुंडेनी केलेल्या वक्तव्यानंतर असे विधान करण्याबाबत खबरदारी घ्या, असे बजावले. मुंडेने केलेला खुलासा ग्राह्यधरून निवडणूक आयोगाने मुंडे यांना बजावून कारावाईतून सुटका केली.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Dec 11, 2013, 03:00 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली
भाजपचे नेते आणि खासदार गोपीनाथ मुंडे यांना निवडणूक आयोगाचा दिलासा मिळाला आहे. मुंडेनी केलेल्या वक्तव्यानंतर असे विधान करण्याबाबत खबरदारी घ्या, असे बजावले. मुंडेने केलेला खुलासा ग्राह्यधरून निवडणूक आयोगाने मुंडे यांना बजावून कारावाईतून सुटका केली.
निवडणूक प्रचारासाठी मला ८ कोटी रूपये खर्च आल्याचे वक्तव्य भाजपचे नेते गोपीनाथ मुंडे यांनी केले होते. यानंतर विरोधकांनी मुंडे यांना टार्गेट केले. दरम्यान, मुंडेच्या या वक्तव्याची दखल निडणूक आयोगाने घेतली. मुंडेना याबाबत कारणे-दाखवा नोटीस बजावून खुलासा करण्याची मागणी केली होती. त्यानंतर आयकर विभागानेही नोटीस बजावली होती. त्यामुळे मुंडे अडचणीत आले होते. त्यानंतर मी हे विधान अवधानाने केले, असा खुलासा मुंडे यांनी केला होता.
बीड लोकसभेच्या २००९च्या निवडणुकीसाठी मला ८ कोटी रूपये खर्च आल्याचे मुंडे यांनी २७ जून २०१२ रोजी एका पुस्तक कार्यक्रमात जाहीर म्हटले होते. या कार्यक्रमात गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी उपस्थित होते. मुंडेंच्या दाव्यानंतर निवडणूक आयोगाने कारणे दाखवा नोटीस बजावली.
मुंडे यांनी सांगितले की, पहिली विधानसभा निवडणूक लढविली त्यावेळी २९,०००रूपये खर्च केलेत. मात्र, गेल्या काही वर्षांमध्ये निवडणूक लढविण्यास जास्त खर्च येत आहे. २००९च्या लोकसभेसाठी ८ कोटी खर्च करावा लागला, असे मुंडे यांनी म्हटले होते.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.