महागाईत खाद्य तेलाचा होणार भडका

कच्च्या खाद्य तेलाच्या आयात शुल्कात वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे तेलाच्या किमतीत वाढ होण्याचे संकेत मिळाले आहे.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Mar 5, 2013, 08:24 PM IST

www.24taas.com, नवी दिल्ली
कच्च्या खाद्य तेलाच्या आयात शुल्कात वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे तेलाच्या किमतीत वाढ होण्याचे संकेत मिळाले आहे.
कच्या खाद्य तेलाच्या आयात शुल्कात वाढ प्रती किलोग्रॅम एक रूपयांनी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे घरगुती वापरण्यात येणाऱ्या खाद्य तेलाची किंमत भडकण्याची शक्यता आहे. त्यामुळे आयात वाढीचे हे संकेत महागाईत तेल ओतण्यास कारणीभूत ठरले आहेत.
खाद्य तेलाचे आयात शुल्क ० वरून २.५ टक्के करण्यात आले आहे. रिफाईंड खाद्य तेलाच्या शुल्कात काहीही बदल करण्यात आलेला नाही. मात्र, आयात शुल्क ७.५ टक्के इतके आहे. त्यामुळे खाद्य तेलाच्या किंमती वाढण्याचे संकेत देण्यात आले आहेत.