छगन भुजबळ यांची आज ईडीकडून चौकशी

दिल्लीतल्या महाराष्ट्र सदन घोटाळ्याप्रकरणी ईडीकडून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांची आज चौकशी होणार आहे. 

Updated: Mar 14, 2016, 08:08 AM IST
छगन भुजबळ यांची आज ईडीकडून चौकशी title=

नवी दिल्ली : दिल्लीतल्या महाराष्ट्र सदन घोटाळ्याप्रकरणी ईडीकडून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांची आज चौकशी होणार आहे. 

चौकशीसाठी हजर राहण्याचे समन्स ईडीनं भुजबळांना बजावले होते. त्यामुळं सकाळी 10 वाजून 40 मिनिटांनी भुजबळ ईडी ऑफिसला येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिलीय.

तत्पूर्वी धनंजय मुंडे यांच्या निवासस्थानी काही आमदारांची बैठक होण्याची शक्यता आहे. त्यानंतर हे आमदार भुजबळांसह ईडी ऑफिसला जाणार असल्याचं समजतंय. 

याप्रकरणी याआधी भुजबळाचं पुतणे पंकज भुजबळ यांना महिन्याभरापूर्वीच अटक करण्यात आलीय. त्याचप्रमाणे त्यांचे पुत्र समीर भुजबळ यांचीही ईडीनं चौकशी केलीय. 

आता भुजबळांनाही चौकशीसाठी बोलावण्यात आल्यानं त्यांच्या अडचणीत भर पडली. महाराष्ट्र सदनाच्या बांधकामात कुठलाही घोटाळा केला नाही असं भुजबळांनी याआधी वारंवार स्पष्ट केलंय. शिवाय यासंदर्भातले सगळे निर्णय कॅबिनेटच्या मंजुरीनंतरच घेण्यात आल्याचाही भुजबळांचा दावा आहे.