जम्मू-काश्मीर, झारखंडमध्ये पाच टप्प्यांत विधानसभा निवडणुका

निवडणूक आयोगानं शनिवारी जम्मू आणि काश्मीर आणि झारखंडमध्ये विधानसभा निवडणुकांची घोषणा केलीय. 

Updated: Oct 25, 2014, 11:40 PM IST
जम्मू-काश्मीर, झारखंडमध्ये पाच टप्प्यांत विधानसभा निवडणुका title=

नवी दिल्ली : निवडणूक आयोगानं शनिवारी जम्मू आणि काश्मीर आणि झारखंडमध्ये विधानसभा निवडणुकांची घोषणा केलीय. 

दोन्ही राज्यांत पाच टप्प्यांत या निवडणुका पार पडतील. पहिल्या टप्प्यातलं मतदान २५ नोव्हेंबरला, दुसऱ्या टप्प्यातलं मतदान २ डिसेंबरला, तिसऱ्या टप्प्यातलं मतदान ९ डिसेंबरला, चौथ्या टप्प्यातलं १४ डिसेंबरला तर पाचव्या टप्प्यातलं मतदान २० डिसेंबर रोजी पार पडणार आहे. दोन्ही राज्यांत मतमोजणी २३ डिसेंबर रोजी होईल. इथं लगेचच आचारसंहिता लागू करण्यात आलीय. 

जम्मू-काश्मीरमध्ये १० हजार मतदान केंद्रांवर तर झारखंड २४ हजार मतदान केंद्रांवर मतदान करतील, अशी माहिती मुख्य निवडणूक आयुक्त व्ही. एस. संपत यांनी दिलीय. 

झारखंड सरकारचा कार्यकाल ३ जानेवारी रोजी तर जम्मू १९ जानेवारी रोजी संपणार आहे. झारखंडमध्ये ८१ तर जम्मू काश्मीरमध्ये ८७ विधानसभा मतदारसंघ आहेत. जम्मू-काश्मीरच्या निवडणुका २००८ मध्ये झाल्या होत्या... महाराष्ट्र विधानसभेसोबतच इथं निवडणुका अपेक्षित होत्या. परंतु, पुरामुळे या तारखा पुढे ढकलल्या गेल्या. इथं २०११ च्या जनगणनेनुसार, जवळपास सव्वा करोड जनसंख्या आहे.  

यावेळी, निवडणूक आयोगानं दिल्लीच्या तीन विधानसभा मतदारसंघांत उपनिवडणुकांच्याही तारकांची घोषणा केलीय. जम्मू काश्मीरच्या पहिल्या टप्प्यातील निवडणुकांसोबतच दिल्लीच्या महरौली, तुगलकाबाद आणि कृष्णा नगर विधानसभा मतदारसंघात मतदान होईल.  

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.