नवी दिल्ली : कोलकाता, गुवाहटी, पाटणा येथे भूकंपाचे धक्के जाणवल्याने अनेकांनी घराबाहेर धाव घेतली. या भूकंपाचा केंद्रबिंदू म्यानमारमध्ये असून ७.० रिश्टर स्केलवर भूकंपाची नोंद करण्यात आलेय.
भारतात ६.८ रिश्टर स्केल अशी नोंद झालेय. म्यानमारमध्ये मोठे हादरे बसलेत. लोकांनी घराबाहेर धाव घेतली. भारत-म्यानमार सीमा भागात १२५ किमी अंतरावर हे केंद्रबिंदू असल्याचे सांगण्यात येत आहे. त्या ठिकाणी ७.१ रिश्टर स्केलची नोंद झाल्याचे सांगण्यात येत आहे.
तर पाटणा येथे जोरदार भूकंपाचे धक्के जाणवलेत. उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊ येथेही भूकंप जाणवला.
Earthquake with magnitude 7.0 hits Myanmar. Tremors felt in many parts of North and East India.
— ANI (@ANI_news) April 13, 2016
कोलकाता, गुवाहटी, पाटणा येथे भूकंपाचे धक्के जाणवलेत.
Crazy scenes in Eden Gardens. All of us felt tremors in the Press box, evacuated and then returned. Earthquake?
— Karthik Lakshmanan (@lk_karthik) April 13, 2016