पाहा व्हिडिओ : झी न्यूजच्या स्टुडिओत जाणवले भूकंपाचे झटके

Updated: Oct 26, 2015, 04:31 PM IST

नवी दिल्ली : पाकिस्तानाच भूकंपाचा केंद्र बिंदू असलेल्या भूकंपाचे झटके दिल्ली आणि एनसीआरमध्ये जाणवले. झी न्यूजचा स्टुडिओ नोएडा येथे असून या ठिकाणीही धक्के जाणवले. 

झीच्या स्टुडिओत ४० सेकंदापेक्षा अधिक काळ भूकंपाचे झटके जाणवले. बुलेटिन सुरू असताना कॅमेरा आणि वर लावलेले लाइट्स हलत होते. अशा परिस्थितीत अँकर आपले बातमी देण्याचे काम सुरू ठेवले होते. 

उत्तर भारत भूकंपाच्या धक्क्यांनी हादरलाय. उत्तर भारतात राजधानी दिल्लीसह, राजस्थान, श्रीनगर,  शिमला, श्रीनगर, चंदीगडला भूकंपाचे धक्के जाणवले. रिश्टर स्केलवर या भूकंपाची तीव्रता ७.५ इतकी मोजण्यात आली आहे.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.