नवी दिल्ली : उत्तर आणि पूर्व भारतात बुधवारी संध्याकाळी सव्वाचारच्या सुमारास भूकंपाचे धक्के जाणवले. आसाम, बिहार, पश्चिम बंगाल, झारखंडमध्ये भूकंपाचे तीव्र धक्के जाणवले.
मिळालेल्या माहितीनुसार, बिहारची राजधानी पाटणा, झारखंडची राजधानी रांची आणि आसाममधील गुवाहाटीमध्येही भूकंपाचे झटके जाणवले.
या भूकंपाची तीव्रता 6.7 रिश्टर स्केल इतकी होती. तर म्यानमारमध्ये या भूकंपाचा केंद्रबिंदू आहे.