वॉशिंग्टन : १९९९च्या कारगिल युद्धात पाकिस्तान भारतावर अणुहल्ला करण्याच्या तयारीत होता अशी माहिती व्हाईट हाऊसच्या एका माजी अधिकाऱ्याने दिलीय.
त्यावेळी सीआयएने तत्कालीन अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बिल क्लिंटन यांना याबाबतचा इशाराही दिला होता. पंतप्रधान नवाझ शरीफ यांच्यासोबतच्या बैठकीदरम्यान ४ जुलै १९९९मध्ये राष्ट्राध्यक्षांना ही माहिती देण्यात आली होती. त्यावेळी शरीफ यांनी हे युद्ध संपवण्यासाठी क्लिंटन यांना मदतीचे आव्हान केले होते.
चार जुलै १९९९च्या सकाळी सीआयएने त्यांच्या गोपनीय डेली ब्रीफमध्ये लिहिलेल्या माहितीनुसार, १९९९ मध्ये पाकिस्तानने भारतावर अण्वस्त्र हल्ल्याची पूर्णपणे तयारी केली होती. पाकिस्तान हल्ला करण्याच्या तयारीत होता.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.