मद्यधुंद पोलिसाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

एका पोलीस अधिकाऱ्याचा न शोभणारा व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये पोलीस मद्यधुंद अवस्थेत पोलीस स्थानकात गोंधळ घालतांना दिसत आहे. हा व्हिडिओ राजस्थानचा आहे. जो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Updated: Mar 17, 2017, 01:00 PM IST
मद्यधुंद पोलिसाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल title=

नवी दिल्ली : एका पोलीस अधिकाऱ्याचा न शोभणारा व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये पोलीस मद्यधुंद अवस्थेत पोलीस स्थानकात गोंधळ घालतांना दिसत आहे. हा व्हिडिओ राजस्थानचा आहे. जो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

पोलिसाचा व्हिडिओ समोर आल्यानंतर त्याला सस्पेंड करण्यात आलं आहे. व्हिडिओमध्ये सुरुवातीला हा पोलीस अधिकारी रस्त्यावर बसलेला दिसत आहे. त्यानंतर तो पोलीस स्थानकात बिना शर्टचा दिसत आहे. पोलिसांनी मग त्या अधिकाऱ्याला गाडीत बसवून घेऊन गेले.