गोव्याच्या मुद्द्यावरुन राज्यसभेत विरोधकांचा गोंधळ

गोव्यामध्ये १३ जागा जिंकणाऱ्या भाजपने दुसऱ्या स्थानावर असूनही राज्यात सरकार स्थापन केलं. या मुद्द्यावरुन राज्यसभेत चांगलाच गोंधळ झाला. काँग्रेसने आरोप केले आहेत की, निकाल आल्यानंतर भाजपने पैशाचा वापर केला आणि बहुमत मिळवलं. काँग्रेस नेत्यांनी याला लोकशाहीची हत्या असल्याचं म्हटलं आहे.

Updated: Mar 17, 2017, 12:34 PM IST
गोव्याच्या मुद्द्यावरुन राज्यसभेत विरोधकांचा गोंधळ title=

नवी दिल्ली : गोव्यामध्ये १३ जागा जिंकणाऱ्या भाजपने दुसऱ्या स्थानावर असूनही राज्यात सरकार स्थापन केलं. या मुद्द्यावरुन राज्यसभेत चांगलाच गोंधळ झाला. काँग्रेसने आरोप केले आहेत की, निकाल आल्यानंतर भाजपने पैशाचा वापर केला आणि बहुमत मिळवलं. काँग्रेस नेत्यांनी याला लोकशाहीची हत्या असल्याचं म्हटलं आहे.

राज्यसभेत विरोधकांच्या गोंधळानंतर कामकाज काही वेळेकरीता स्थगित करण्यात आलं. काँग्रेसचे वरिष्ठ नेते दिग्विजिय सिंह यांनी गोव्याचे राज्यपाल मृदुला सिन्हा यांच्यावर ही आरोप केले आहेत. त्यांचं म्हणणं होतं की, सगळ्यात मोठा पक्ष असूनही काँग्रेसला बहुमत सिद्ध करण्यासाठी आमंत्रण नाही दिलं गेलं.