जयपूर साहित्य संमेलनात डॉ. सुभाष चंद्रा यांचे आत्मचरित्र प्रकाशित

एस्सेल ग्रुपचे चेअरमन डॉ. सुभाष चंद्रा यांचे आत्मचरित्र 'द झी फॅक्टर : माय जर्नी एस द राँग मॅन अॅट द राईट टाईम' याचे प्रकाशन गुरुवारी जयपूर साहित्य संमेलनात  करण्यात आले. हा प्रकाशन सोहळा मान्यवरांच्या उपस्थित झाला. यावेळी एम जे अकबर आणि वल्लभ भन्साली उपस्थित होते.

Updated: Jan 22, 2016, 04:10 PM IST
जयपूर साहित्य संमेलनात डॉ. सुभाष चंद्रा यांचे आत्मचरित्र प्रकाशित title=

जयपूर : एस्सेल ग्रुपचे चेअरमन डॉ. सुभाष चंद्रा यांचे आत्मचरित्र 'द झी फॅक्टर : माय जर्नी एस द राँग मॅन अॅट द राईट टाईम' याचे प्रकाशन गुरुवारी जयपूर साहित्य संमेलनात  करण्यात आले. हा प्रकाशन सोहळा मान्यवरांच्या उपस्थित झाला. यावेळी एम जे अकबर आणि वल्लभ भन्साली उपस्थित होते.

जयपूर साहित्य संमेलनात बोलताना डॉ. सुभाष चंद्रा म्हणालेत,  व्यवसाय भ्रष्टाचार न करता शक्य आहे. पैसे आपल्याला अहंकारी बनवू शकतो. त्यांनी आपल्या जीवनातील काही गोष्टींना उजाळा दिला. मला आर्म्स डीलची ऑफर आली होती. मात्र, मी ती नाकारली. आर्म्स डीलपेक्षा लोकांचे मनोरंजन करणे अधिक चांगले आहे.

राजस्थानची राजधानी आणि गुलाबी रंगाचे शहर जयपूरमध्ये ९ साहित्य संमेलन भरले. याचे उद्धाटन आज झाले. राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांनी दीप प्रज्जवलन करून संमेलनाचे उद्घाटन केले. यावेळी देश-विदेशातील अनेक नामवंत लेखक आणि मान्यवर व्यक्ती, पाहुणे उपस्थित होते. हे संमेलन ५ दिवस  चालणार आहे.

'The Z Factor - My Journey as the Wrong Man at the Right Time'या डॉ. सुभाष चंद्रा यांच्या पुस्तकाचे प्रकाशन बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते त्यांच्या निवासस्थानी करण्यात आले. यावेळी आमंत्रित पाहुण्यांनी डॉ. सुभाष चंद्रा यांच्यासोबत आठवणींना उजाळा दिला. आत्मचरित्राबाबत बोलताना पंतप्रधान मोदींनी सांगितले, ही जीवनातील अनुभवांची कुंजी जास्त आहे.  काही कारणाने १७ रुपये घेऊन बाहेर पडलेला मुलगा आज १७ हजार कोटींचा मालक होतो. एस्सेल ग्रुप आणि झी नेटवर्कचे सर्वेसवा सुभाष चंद्रा यांच्यात मोठी रिक्स घेण्याची क्षमता आहे.

हे पुस्तक हार्पर कोलिन्स यांनीही प्रकाशित केले. हे पुस्तक सर्व दुकानात उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. फ्लिफकार्ट आणि अमेझॉन इंडियावर प्री-ऑर्डर करण्यासाठी आधीच उपलब्ध करुन दिले आहे. पुस्तक प्रोमो, कार्यक्रम अपडेट आणि पुस्तकातील काही अंश ट्विटरवर आणि फेसबूकवर उपलब्ध करण्यात येणार आहेत.

डॉ. सुभाष चंद्रा हे  भारतीय मीडियात एक सम्राट म्हणून ओळखले जात आहेत. त्यांनी १९९२ मध्ये देशातील पहिले उपग्रह हिंदी चॅनेल झी टीव्ही आणि त्यानंतर पहिले खासगी न्यूज चॅनेल लॉन्च करुन टेलिव्हीजन उद्योगात एक क्रान्ती घडवून आणली. त्यांना भारतातील सॅटेलाईट टीव्ही क्रांतीचे जनक संबोधले जाते. २०११ मध्ये डॉ. सुभाष चंद्रा इंटरनॅशनल अॅमी डायरेक्टोरेट अवॉर्डने त्यांना सन्मानीत करण्यात आलेय. हा पुरस्कार मिळणारे ते पहिले भारतीय आहेत. त्यांना युनिर्व्हसिटी ऑफ ईस्ट लंडनची डॉक्टरेट मानद पदवी प्रदान करण्यात आली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी....