नवी दिल्ली : जनरल पर्वेज मुशर्रफ हे २००५ साली भारतात आले होते, तेव्हा त्यांनी तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंह यांच्यासह तत्कालीन राष्ट्रपती डॉ.एपीजे अब्दुल कलाम यांच्याशी देखील बातचीत केली होती.
डॉ.कलाम यांच्याशी मुशर्रफ उद्या चर्चा करणार होते, म्हणून आदल्या दिवशी कलाम यांचे सचिव पीके नायर यांनी त्यांना सांगितलं, "सर उद्या मुशर्रफ तुम्हाला भेटायला येणार आहेत."
डॉ.कलाम यांनी उत्तर दिलं, "हो मला माहित आहे."
नायर यांनी डॉ.कलाम यांना सांगितलं, "मुशर्रफ उद्या निश्चितच काश्मीरचा मुद्दा लावून धरतील, तुम्हाल तयार राहायला पाहिजे."
यानंतर कलाम एक क्षण थांबले, त्यांनी नायर यांच्याकडे पाहिलं आणि सांगितलं, "तुम्ही त्याची चिंता करू नका, मी पाहून घेईन."
तीस मिनिटांची चर्चा
दुसऱ्या दिवशी बरोबर सात वाजता परवेज मुशर्रफ आपल्या ताफ्यासह राष्ट्रपती भवनात पोहोचले, त्यांना पहिल्यांदा नॉर्थ ड्राईंग रूमला नेण्यात आलं, कलाम यांनी त्यांचं स्वागत केलं, त्यांना खुर्ची दिली आणि बाजूला जाऊन बसले.
डॉ.कलाम यांनी बोलण्यास सुरूवात केली, "राष्ट्रपती महोदय, भारताप्रमाणे तुमच्या इथंही अनेक ग्रामीण भाग आहेत, आपण त्या भागांचा मिळून विकास केला पाहिजे, असं नाही का तुम्हाला वाटत?", त्यावर मुशर्ऱफ यांना "हो" शिवाय काहीही उत्तर देता येत नव्हतं.
आपण यासाठी पूरा राबवू शकतो, मी तुम्हाला पूराचा अर्थ सांगतो, पूरा म्हणजे "प्रोव्हायडिंग अर्बन फॅसिलिटीज टू रूरल एरियाज".
यानंतर मागे लावलेल्या प्लाझमा स्क्रीनवर प्रेझेंटेशन सारखं लेक्चर सुरू झालं. दोन्ही देश २० वर्षात रूरलसाठी काय करतीय, यावर डॉ.कलाम मुशर्रफ यांना लेक्चर देत होते.
तीस मिनिटानंतर कलाम यांना मुशर्ऱफ म्हणाले, "भारत भाग्यशाली आहे, कारण आपल्या सारखा शास्त्रज्ञ राष्ट्रपती आहे.", असं म्हणून हस्तांदोलन करून मुशर्रफ निघून गेले.
यानंतर कलामांचे सचिव नायर यांनी आपल्या डायरीत लिहलं, "डॉ. कलाम यांनी दाखवून दिलं, शास्त्रज्ञ कुटनीतीही खेळू शकतात."
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.