फेसबुकवर पॉर्न न पाहण्याचे जवानांना आदेश

लष्करांच्या जवानांसाठी नवे फर्मान काढण्यात आलेय. लष्कराने जवानांना फेसबुकवर पॉ़र्न न पाहण्याचे आदेश दिलेत. 

Updated: Jan 4, 2016, 04:43 PM IST
फेसबुकवर पॉर्न न पाहण्याचे जवानांना आदेश title=

नवी दिल्ली : लष्करांच्या जवानांसाठी नवे फर्मान काढण्यात आलेय. लष्कराने जवानांना फेसबुकवर पॉ़र्न न पाहण्याचे आदेश दिलेत. 

सोशल मीडियाचा वापर कसा करावा याबाबतच्या सूचना जवानांना देण्यात आल्यात. फेसबुकवर अथवा अन्य सोशल नेटवर्किंग साईटवर कोणत्याही अनोळख्या व्यक्तीची रिक्वेस्ट स्वीकार करु नका असेही सांगण्यात आलेय. लष्कराने हे आदेश केवळ जवानांना नव्हे तर जवानांच्या कुटुंबियानाही दिलेत.

काही दिवसांपूर्वी एअरफोर्सचा जवान रंजीतला आयसिसची हेरगिरी केल्याप्रकरणी अटक कऱण्यात आली होती. या जवानाने फेसबुकद्वारे एका महिलेला ही माहिती पुरवल्याचे उघड झाल्यानंतर हे आदेश देण्यात आलेत. 

या प्रकरणाची गंभीर दखल घेत ३१ जानेवारी रोजी जवानांने हे आदेश देण्यात आलेत. सोशल साईट फेसबुक, व्हॉट्सअॅपर स्वत:चे प्रोफाईल फोटो ठेवू नयेत. तसेच सोशल साईटवर कोणत्या ठिकाणची पोस्टिंग आहे, बटालियनचे नाव आणि रँकबाबत माहिती टाकण्यासही मनाई कऱण्यात आलीय.