नवी दिल्ली : डेबिट कार्डबाबतची माहिती हॅक झाल्यामुळे ग्राहकांनी घाबरून जाऊ नये असं आवाहन केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटलींनी केलं आहे. याप्रकरणी आरबीआय आणि दुसऱ्या बँकांना अहवाल सादर करण्याचे आदेशही अर्थमंत्र्यांनी दिले आहेत. लवकरच या हॅकर्सपर्यंत पोहोचू आणि त्यांच्यावर कारवाई करु असं आश्वासनही अर्थविभागाचे सचिव शक्तीकांत दास यांनी दिली आहे.
देशातल्या 19 बँकांमधल्या 32 लाख डेबिट कार्ड धारकांची माहिती हॅक झाल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. ही माहिती हॅक झाल्याचा सगळ्यात मोठा फटका एसबीआयला बलला आहे. यानंतर एसबीआयनं त्यांच्या सहा लाख ग्राहकांना कार्ड बदलण्याची सूचना केली.
डेबिट कार्डाद्वारे होणाऱ्या अवैध व्यवहारांचा फटका खाजगी बँकांनाही बसलाय. त्यात ICICI, HDFC, आणि AXIS बँकेचा समावेश आहे. खबरदारीसाठी आयडीबीआय बँक, बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ बडोदा या बँकांनीही ग्राहकांची कार्ड ब्लॉक करण्याची तयारी सुरु केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.