www.24taas.com,झी मीडिया, नवी दिल्ली
पुन्हा एकदा महागाईचा भडका उडण्याची शक्यता आहे. महागाईच्या आगीत पेट्रोलपाठोपाठ आता डिझेलच्या दरात ५० पैशानी वाढ करण्याचा निर्णय तेलकंपन्यांनी घेतलाय. ही दरवाढ मध्यरात्रीपासून लागूही झाली आहे.
या वर्षातील ही सहावी वाढ आहे. मुंबईमध्ये ही दरवाढ ६२ पैसे आहे. याठिकाणी डिझेलचा प्रतिलिटर ५७.५१ असा दर असणार आहे. तर राजधानी दिल्लीमध्ये डिझेलचा दर प्रतिलिटर ५०.२६ वरून ५०.८४ रुपये झाला आहे.
कोलकत्यात ५५.१६ आणि चेन्नईत ५४.१५ रुपये झाला आहे. तेलकंपन्यांनी शुक्रवारीच पेट्रोलच्या दरात १.८२ रुपयांनी वाढ केली होती. त्यानंतर डिझेलची दरवाढ झाल्याने महागाईला आणखी आमंत्रणच मिळाले आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.