दिवाळीमध्ये ४९१ कर्मचाऱ्यांना कार बाकींना 2BHK प्लॅट आणि दागिने

दिवाळीच्या तोंडावर सुरतच्या एका डायमंड कंपनीनं त्यांच्या कर्मचाऱ्यांना जे गिफ्ट दिलंय त्याची आपण कल्पना देखील करू शकत नाही. या कंपनीनं कर्मचाऱ्यांना कार, फ्लॅट आणि हिरे जडीत दागिने गिफ्टमध्ये केले आहेत.

Updated: Oct 21, 2014, 12:48 PM IST
दिवाळीमध्ये ४९१ कर्मचाऱ्यांना कार बाकींना 2BHK प्लॅट आणि दागिने title=
नवी दिल्ली : दिवाळीच्या तोंडावर सुरतच्या एका डायमंड कंपनीनं त्यांच्या कर्मचाऱ्यांना जे गिफ्ट दिलंय त्याची आपण कल्पना देखील करू शकत नाही. या कंपनीनं कर्मचाऱ्यांना कार, फ्लॅट आणि हिरे जडीत दागिने गिफ्टमध्ये केले आहेत.
 
हरेकृष्ण एक्सपोर्टस कंपनीचे मालक आणि हिरा व्यापारी साबुभाई ढोलकिया यांनी बोनससाठी कर्मचाऱ्यांची एकूण १२०० कर्मचाऱ्यांची यादी बनविली होती. या यादीतील ४९१ कर्मचाऱ्यांना चकचकीत कार तर बाकीच्या ५२५ कर्मचाऱ्यांना दागिने आणि २०७ कर्मचाऱ्यांना 2BHk फ्लॅट दिले आहे.
 
दिवाळीच्या गिफ्टसाठी ५० कोटींचं बजेट
ज्या कर्मचाऱ्यांना महगाडे गिफ्ट मिळाले आहेत. ते सर्वजण हिऱ्याचे कर्मचारी आहे. 'या कारागिरांनी चांगलं प्रर्दशन केल्यामुळं कंपनीला खूप मोठा फायदा झाला आहे', असं कंपनीच्या मालकांनी म्हटलंय. यामुळं सर्व कर्मचाऱ्यांना खूश करण्यासाठी ५० कोटींचं बजेट ठेवलं होतं, असंही ते म्हणाले.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.