सूरत : नोटबंदीला आता एक महिना झाला तरी अनेक समस्या कायम आहेत. छोटे-मोठे उद्योग अडचणीत आले आहेत. सूरतमधील हिरे व्यावसायिक यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे.
नोटबंदीनंतर सूरतमधील वराछा परिसरातील हिऱ्यांना पैलू पाडण्याचे काम आणि कारखाने अडचणीत सापडले आहेत. विजय पटेल यांच्या कारखान्यात जवळपास १०० लोक कमा करत आहेत. त्यातील अर्ध्यांपेक्षा जास्त लोक बॅंकेत लाईनमध्ये उभे असतात. त्यामुळे ते हिरा कारखान्यात येत नाहीत. विजय पटेल यांनी नोटबंदीचे स्वागत केले आहे. मात्र, कॅशलेस सिस्टीमशी ते अनभिज्ञ आहेत.
सूरतमधील अन्य व्यवसायिकांची अशीच स्थिती आहे. सूरतमध्ये हिरा कटिंग आणि पॉलिशिंगचे काम होते. ९३ टक्के व्यवसाय हा आयात तर ७ टक्के स्थानिक बाजारात व्यवसाय होतो. जवळपास २५० लाख कोटीच्या बाजारात ३५ ते ४० टक्के हिस्सेदारी आहे.