नवी दिल्ली : बंगळूरुच्या धारवाड जिल्ह्यातील मनागुंडी गावात एक विचित्र घटना समोर आलीये. अंत्यसंस्काराला नेत असतानाचा मृत व्यक्ती जिवंत झाल्याची घटना येथे घडलीये.
बंगळुरु मिररच्या रिपोर्टनुसार कुमार मारेवाड असं या मुलाचे नाव आहे. गेल्या आठवड्यात कुमारची प्रकृती बिघडल्याने त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्याची प्रकृती अधिकच ढासळल्याने त्याला व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते.
अखेर डॉक्टरांनी त्याच्या घरच्यांना सांगितले की त्याची प्रकृती अंत्यत नाजूक असून तो लाईफ सपोर्टशिवाय जगू शकत नाही. यावेळी घरच्यांनी त्याला घरी नेण्याचा निर्णय घेतला. घरी नेल्यानंतर कुमारच्या हालचाली पूर्णपणे बंद झाल्या. यावेळी कुमारला मृत समजून त्याच्या घरच्यांनी त्याच्या अंत्यसंस्काराची तयारी सुरु केली. दोन किमी अंतरावर अंत्यसंस्काराला नेलेच जाणार होते मात्र त्याचवेळी अचानक कुमार हालचाल करु लागला. त्याच्या श्वासातील गती वाढली. त्याला तातडीने रुग्णालयात नेण्यात आलेय. अद्यापही त्याची प्रकृती नाजूक आहे.