www.24taas.com, झी मीडिया,नवी दिल्ली
रूपयांचे मूल्य घसरणे ही चिंतेची बाब आहे. सीरिया संकटामुळे अर्थकारणावर परिणाम झाला आहे. तसेच करंट अकाऊंट डेफिसिटमुळे रूपया घसरला आहे. डॉलरच्या तुलनेत रूपयाची घसरण ही देशापुढील आर्थिक चिंता आहे, असे निवेदन पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचे लोकसभेत केले.
सुधारणांची गरज सध्याच्या आर्थिक घडामोडींच्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा आर्थिक सुधारणा करण्याची गरज असल्याचे मत पंतप्रधानांनी व्यक्त केले. चालू खात्यावरील तूट भरून काढू. त्यानंतर रुपया पूर्ववत होईल. विदेशी चलनाची २७ हजार ८००कोटी डॉलरची गंगाजळी गरज भागविण्यासाठी पुरेशी आहे. भारतीय अर्थव्यवस्थेची मूलतत्त्वे भक्कम आहेत, अशी ग्वाही पंतप्रधानांनी यावेळी दिली.
आर्थिक वर्षाच्या पुढील सहामाई सत्रात तुट ४.८ टक्क्यांपर्यंत नियंत्रित होईल असे सांगून रुपयाची घसरण आणि तेलाच्या किमतीतील वाढ यांचा आणखी भार दरवाढीवर पडेल. फक्त रुपयाची घसरण झाली नाही. ब्राझील, तुर्कस्तानच्या चलनाचीही घसरण झाली आहे. रुपयाच्या मूल्यातील घसरण ही देशाबाहेरील घडामोडींची बाजारपेठेत उमटलेली प्रतिक्रिया आहे, ते म्हणालेत.
विरोधकांची बाजू ऐकून न घेतल्याने भाजपने सभात्याग केला. सोन्याची खरेदी कमी करावी, तसेच इंधनाचा वापर कमी करावा असे आवाहन पंतप्रधानांनी यावेळी देशवासीयांना केले. सहकार्याचे आवाहन भारतीय अर्थव्यवस्थेच्या स्थिर वाढीसाठी सरकार प्रयत्न करत असून, सर्व राजकीय पक्षांनी एकत्रित येऊन अर्थव्यवस्था पूर्ववत करण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहनही पंतप्रधानांनी केले.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.